मुंबईत सावत्र बापाने अत्याचार करून दोन वर्षीय चिमुरडीचा गळा घोटला!

मुंबई: सावत्र पित्याने लैंगिक अत्याचार आणि छळ करुन दोन वर्षाच्या बालिकेची गळा आवळून हत्या केल्याची खळबळजनक घटना पूर्व उपनगरातील कामगार वस्तीत उघड झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.


पीडित बालिकेची आई घरकाम करते. तिने पहिल्या पतीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आरोपीसह नव्याने संसार थाटला . आरोपी हा रिक्षाचालक असून त्यांच्यासोबत राहणारी सावत्र मुलगी खटकू लागली होती. वैवाहिक आयुष्यात अडथळा ठरत असल्याने तो तिचा द्वेष करू लागला. शुक्रवारी पीडित मुलीची आई कामावरून घरी आली तेव्हा ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिला त्वरित जवळच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार दरम्यान पीडित मुलीला मृत घोषित करण्यात आले.पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

Ameet Satam : "अदानींची प्रगती टोचते, मग कोहिनूर स्क्वेअर कसं उभं राहिलं?" अमित साटम यांचा राज ठाकरेंना थेट सवाल

मुंबई : "ठाकरे बंधूंना अदानींच्या प्रगतीची समस्या नसून, स्वतःची 'आमदानी' कमी झाल्याचे हे दु:ख आहे. मराठी माणसाचा

BJP New Rap Song : निवडणुकीच्या रिंगणात भाजपचं 'रॅप वॉर'! भाजपच्या रॅप साँगमध्ये ठाकरेंवर प्रहार, तर फडणवीसांचा 'धडाकेबाज' अंदाज

मातोश्रीचे 'खास' गिळत होते मुंबईकरांचा घास मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने प्रचाराचा

BMC Election 2026 : घराबाहेर पडताय? मग आधी हे वाचा! मुंबईतील सायन, कांदिवली आणि मालाडमध्ये वाहतुकीत मोठे फेरबदल; पाहा पर्यायी मार्ग

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. या

भटक्या कुत्र्यांसाठी गायक मिका सिंगची न्यायालयाला विनंती

१० एकर जमीन दान करण्याची तयारी मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू

BMC Election:बीएमसी निवडणुकीसाठी मुंबईत १,०६५ खास ‘बेस्ट’ बस सेवेत

मुंबई: मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाज व्यवस्थित पार पाडावे यासाठी

अनिल अंबानींना हायकोर्टाचा दिलासा सुरूच; बँकांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडसंदर्भातील कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई उच्च