काव्यांजली

तुझ्यात व्यस्त राहतो - डॉ. मनोज वराडे


तुझ्यात व्यस्त राहतो अजूनही अजूनही
तुझा वसंत मागतो अजूनही अजूनही!


सुखावतो सखे मला तुझा विचार सारखा
तुला कवेत पाहतो अजूनही अजूनही!


गुलाब कस्तुरी नको, सुगंध चंदनी नको
तुझाच गंध भावतो अजूनही अजूनही!


कितीक आर्जवे करू,वळून तू पहा जरा...
तुला पुन्हा खुणावतो अजूनही अजूनही!


झरे अनेक वाहती...किती किती भिजायचे?
तुझ्या स्मृतीत न्हाहतो अजूनही अजूनही!


दुरावलीस का अशी? प्रमाद सांग कोणता?
पुन्हा पुन्हा विचारतो अजूनही अजूनही!



अनंतातून अनंताकडे- स्वाती गावडे, ठाणे


मनाचे तरंग
सूर्याचे किरण
अनंतातून अनंताकडे


चांदण्यांचा साज
चंद्राचं तेज
अनंतातून अनंताकडे


पृथ्वीची गती
सागराची भरती-ओहोटी
अनंतातून अनंताकडे


रिमझिम पाऊस
अवखळ झरे
अनंतातून अनंताकडे


जन्माचा जल्लोष
मृत्यूचा सोहळा
अनंतातून अनंताकडे


श्वास उच्छवास
परमात्म्याचा वास
अनंतातून अनंताकडे


Comments
Add Comment

घटस्फोटातील नात्याची गोष्ट…!

मी मागे माझ्या एका लेखामधे म्हटले होते की, राज्यनाट्य स्पर्धेमधील काही नाटके व्यावसायिक दर्जाची असतातच. त्याला

आनंदाचा ठेवा... भोंडला!

तेव्हा नवरात्र सुरू झाली की आम्हा मुलींना अगदी आनंदाचं भरतं यायचं. बहुतेक करून शाळेतच, वर्गातच खुसुखुसू करत,

वेगवेगळ्या भूमिका करायला  मिळणे हाच टर्निंग पॉइंट

पुनीत वशिष्ठ स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला आहे. ‘चलो बुलावा आया है, माता ने

पडद्यामागचा ‘दशावतार’...

रूपेरी पडद्यावर सध्या ‘दशावतार’ या मराठी सिनेमाने जादू केली असल्याचे चित्र आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन दोन

कल्पना एक...’चे  अस्तित्त्व अंतिम टप्प्यात...

एकांकिकांच्या विश्वात विशेष स्थान राखून असलेल्या ‘अस्तित्त्व’ या संस्थेच्या ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या

रंगीबेरंगी घागऱ्यावर ऑक्सिडाईजचा नखरा!

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर नवरात्र म्हटलं की, सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतात ते रंगीबेरंगी घागरे, गरबा-दांडियाचा