संजय राऊत स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी भाजपमध्ये येण्यासाठी आतुर

भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट


दुसऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बोलण्या अगोदर संजय राऊतने स्वतःचेच बोलावे


राऊत हा उबाठाचा सुद्धा नाही हे ठाकरेंना २३ नंतर कळेल


कणकवली : स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी संजय राऊत हे भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी किती आतुर झाले होते. याचे पुरावे मी महाराष्ट्रा समोर देईन तेव्हा संजय राऊत यांना तोंड काळे करत फिरावे लागेल. त्यामुळे संजय राऊत यांनी दुसऱ्यांच्या प्रवेशावर बोलू नये. तुम्ही काय दुधासारखे स्वच्छ नाही आहात. मातोश्रीमध्ये येणाऱ्यांमध्ये सर्वात मोठा बेइमान संजय राजाराम राऊत आहे हे उद्धव ठाकरे यांना जेव्हा कळेल तेव्हा उशीर झालेला असेल. उरली सुरली उबाठा सुद्धा संपवायच्या मार्गावर राऊत आहे, हे उद्धव ठाकरेंना २३ तारखे नंतर कळेल, अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.


आमच्या कुठल्या नेत्यांच्या घराच्या बाहेर याचा भाऊ आ.सुनील राऊत चार तास उभा होता. हा जेव्हा जेलमध्ये गेलेला तेव्हा ह्याच्या आमदार भावाने मातोश्रीला कुठली धमकी दिली. कसे मातोश्रीला नागडे करू अशी धमकी दिली होती.ही भाषा मातोश्री बद्दल वापरलेली होती. ह्यांना भारतीय जनता पक्षामध्ये यायचं होते. पक्षात घेण्यासाठी भिक मागत होता. याचा पूर्ण तपशील महाराष्ट्राला मला दाखवावा लागेल, सांगायला लागेल म्हणून दुसऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बोलण्या अगोदर तुम्ही तुमचे पहा. जनता पक्षामध्ये प्रवेश आमच्या वरिष्ठांनी नाकारल्यामुळे आज तुम्ही उबाठा मध्ये बसलेला आहात त्याबद्दल बोला, असे संजय राऊत यांना नितेश राणे यांनी सुनावले.

Comments
Add Comment

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत