शेफालीच्या मृत्यूमागे'काळी जादू' केल्याचा आरोप; अभिनेता पराग त्यागीचा खळबळजनक दावा

अभिनेता पराग त्यागीने पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये शेफाली जरीवालाच्या मृत्यूवर खळबळजनक वक्तव्य केले आहे.जून २०२५ मध्ये शेफालीचा अचानक मृत्यू झाला होता,ज्याने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला होता. शेफालीच्या मृत्यूमागे 'काळी जादू' केल्याचा आरोप परागने केला आहे.अधिकृत वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण 'हृदयविकाराचा झटका' सांगितले असतानाही, परागने यामागे करणी-बाधा किंवा काळी जादू असल्याचा दावा केला आहे.


"शेफालीवर कुणीतरी काळी जादू केली होती!"


'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अनेक महिन्यांनी तिचा पती पराग त्यागी याने या प्रकरणाला नवे वळण दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पारस छाब्राच्या पॉडकास्टमध्ये त्याने याविषयीचे त्याचे अनुभव सांगितले.


परागने सांगितले की, "अनेक लोक या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत, पण माझा यावर ठाम विश्वास आहे. जिथे देव आहे, तिथे सैतानही आहे. लोक स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. मला १०० टक्के माहिती आहे की कुणीतरी काहीतरी (काळी जादू) केले आहे". अशा प्रकारचा अनुभव मला एकदा नाही तर दोनदा आला होता. पहिल्या वेळी त्यातून बचाव झाला, पण दुसऱ्या वेळी मात्र गोष्टी खूप गंभीर होत्या, असं परागने सांगितलं.


पूजेदरम्यान जाणीव


"मी जेव्हा पूजेला बसायचो, तेव्हा मला काहीतरी अघटित घडत असल्याची जाणीव व्हायची. ती खूप हसमुख मुलगी होती, पण तिला स्पर्श केल्यावरच मला जाणवायचे की काहीतरी गडबड आहे. म्हणूनच मी पूजा वाढवली होती," असे परागने नमूद केले.


वैद्यकीय अहवाल काय सांगतो?


पराग त्यागीने काळ्या जादूचा दावा केला असला तरी, अधिकृत वैद्यकीय अहवालात शेफालीच्या मृत्यूचे कारण 'कार्डियाक अरेस्ट' (हृदयविकाराचा झटका) असे नमूद करण्यात आले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी किंवा तपास यंत्रणांनी आतापर्यंत कोणत्याही जादूटोण्याबाबत किंवा संशयास्पद बाबींचा उल्लेख केलेला नाही.

Comments
Add Comment

Ankita Walawalkar : "मी CJP ला पाठिंबा देत नाही तर मी..."; बिग बॉसफेम अंकिता वालावलकरने घेतली स्पष्ट भूमिका

मुंबई : सोशल मीडिया रिल्स क्रिएटर आणि बिग बॉस फेम अभिनेत्री अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) आपल्या भूमिकेबाबत सुरू

Accident News : प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वयाच्या १८ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

Accident News : एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. भीषण अपघातात प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

Delhi Protest Reactions : सौरभ गोखलेचं विद्यार्थी आंदोलनावर भाष्य; 'शैक्षणिक मागण्या योग्य, पण...'

मुंबई : नीट परीक्षा पेपरफुटी (NEET Paper Leak Case) प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री (Union Education Minister) धर्मेंद्र प्रधान यांच्या

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या आरोग्याबाबत नवी चर्चा; ८३ व्या वर्षीही अनेक गंभीर आजारांचा सामना

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रकृतीबाबत (Health Update) पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर 'या' जेष्ठ अभिनेत्रीने केला 'केमो कर्ल्स'मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी

Eetha Movie : 'इठा' चित्रपटावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार! विठाबाईंच्या कुटुंबीयांचा संताप; म्हणाले, "इतिहासाची मोडतोड खपवून...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा