मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध आश्वासनेही दिली जात आहे. यात मध्य महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या एका उमेदवाराने आश्वासन दिले आहे की ते विधानसभा निवडणूक जिंकले तर ते तेथील अविवाहितांची लग्ने लावतील.
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून निवडणूक लढवणारे राजेसाहेब देशमुख यांनी हे आश्वास दिले आहे. ग्रामीण भागातील विवाहयोग्य तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची मोठी समस्या आहे. देशमुख यांचे हे विधान बुधवारी व्हायरल झाले.
राजेसाहेब देशमुख म्हणाले, जर मी आमदार झालो तर सर्व अविवाहितांचे विवाह करून देईल. आम्ही तरुणांना रोजगार देऊ. लोक नवरीच्या शोधातील लोकांना विचारता की तरूणाकडे नोकरी आहे का की व्यवसाय आहे. त्यामुळे ही मोठी समसमया आहे.
धनंजय मुंडेंशी सामना
राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होत आहे. परळीमध्ये देशमुख यांच्याविरोधात राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आहे जे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.