Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Devendra Fadnavis : टंचाईग्रस्त नांदेडमध्ये गोदावरीचे पाणी आणणार!

Devendra Fadnavis : टंचाईग्रस्त नांदेडमध्ये गोदावरीचे पाणी आणणार!

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन


नांदेड : महायुतीचे उमेदवार भिमर्सव केराम यांच्या प्रचारार्थी सभा आयोजित केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली असून नांदेडमधील टंचाईग्रस्तांसाठी गोदावरीचे पाणी आणणार असल्याचे आश्वासन केले आहे.



५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणणार


महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केराम यांनी हजारो कोटी रुपयांची कामे मतदार संघामध्ये केली आहेत. यापुढेही पुढ देखील आपलंच सस्कार येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी चिंता करु नका. कारण पुढील काळात टंचाईग्रस्त नांदेडमध्ये पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार नांदेडमध्ये ५४ टीएमसी पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहेत, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.


त्याचबरोबर, दुष्काळी भाग म्हणून मराठवाडा विभागाची ओळख आहे. कारण मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. गोदावरीचे पाणी आणण्याचे काम सुरु केले असून लवकरच पूर्ण करून आम्ही शेतकयांच्या तसेच नागरिकांच्या जीवनातील पाणीप्रश्न कायमचा सोडवणार आहे असेही त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment