पालघरच्या तरुणाला मारण्यासाठी नाशिकमध्ये सुपारी घेतलेल्या लुधियानातील 'सुपारीबाज' तरुणाला पालघरमधून अटक

पालघर : पालघर येथील राहुल पवार याला मारण्याची नाशिकमधून सुपारी घेणाऱ्या शुभम सिंग (२९, रा. लुधियाना) याला पालघरमध्ये जेरबंद करण्यात आले आहे. नाशिकमधील तुरुंगात असलेल्या दोन आरोपींनी त्याला या हत्येची सुपारी दिली होती, असे स्पष्ट झाले असतानाच तो 'सुपारीबाज' असल्याचेही पोलीस चौकशीत उघड झाले आहे.


पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड हे आपले सहकारी उपनिरीक्षक अविनाश वळवी, संकेत पगडे, सहायक फौजदार खंडागळे, हवालदार अशोक तायडे, परमेश्वर मुसळे, सागर राऊत, आकाश आराक, खरपडे, राऊत यांच्यासह गस्त घालत असताना पालघर रेल्वे स्थानकाजवळ एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावेळी पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, अशी एकूण एक लाख ६६ हजार किमतीची घातक शस्त्रे सापडली.


त्याचे नाव शुभम सिंग असे असून तो लुधियानातील व्यक्ती असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. यावेळी नाशिक तुरुंगामध्ये खून आणि दरोड्याच्या प्रकरणातील आरोपी परमिंदर ऊर्फ गौरव राजेंद्र सिंग आणि सातपूर पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल असलेला आरोपी आशिष राजेंद्र जाधव या दोघांनी राहुल पवार याला ठार मारण्याची सुपारी त्याला दिल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.


शुभम याने अनेक दिवस राहुल पवार यांच्या घराजवळ रेकी करून त्याला ठार मारण्याचे प्रयत्न केले, मात्र ते यशस्वी होत नसल्याने त्याने कंटाळून बोईसर येथील आपल्या नातेवाइकांशी संपर्क साधत त्यांच्या घरी येत असल्याचे कळवले. तो पालघर रेल्वे स्थानकाजवळ आला असताना पालघर पोलिसांनी त्याला रिव्हॉल्व्हरसह अटक केली. यावेळी त्याला नेण्यासाठी बोईसर येथून आलेला रिक्षाचालक आणि अन्य एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Comments
Add Comment

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

अब्जाधीशांच्या यादीत भारताचा प्लास्टिक किंग

नवी दिल्ली : फोर्ब्स ही कायम अब्जाधीशांची यादी जाहीर करतात. या यादीत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या

मुंबईत आधीपासूनच ८ ठिकाणी भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण

मुलुंडमध्ये विरोध झाल्याने महापालिका अधिकारी झाले अवाक् मुंबई : महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईत एकूण ८

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री?

भाजप आणि लोक जनशक्ती पक्षालाही मिळणार नेतृत्वाची संधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी बिहारमध्ये सरकार

५०० कोटींचे रुग्णालय अजित पवारांच्या भाच्याला?

अंजली दमानिया यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे अमेडिया या