Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडी

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळून तीन मजूर ठार, बचावकार्य सुरू

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळून तीन मजूर ठार, बचावकार्य सुरू

अहमदाबाद: गुजरातच्या आनंद जिल्ह्यात अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पातील बांधकाम सुरू असलेला पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.


या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत चार मजुरांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात सध्या उपचार चालू आहेत. तसेच या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे.


 


या अपघाताची माहिती मिळताच नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (NHSRCL) अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनएचएसआरसीएल बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम करत आहे. एनएचएसआरसीएलकडून घटनेनंतर एक निवेदन देखील जारी केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की आनंद येथील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामाच्या ठिकाणी काँक्रीटचे ब्लॉक कोसळले आहेत.


या दुर्घटनेनंतर आम्ही मदत व बचावकार्य हाती घेतलं आहे. आनंद पोलील व अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचाव मोहीम सुरू केली आहे. आम्ही बचाव मोहीमेवर लक्ष ठेवून आहोत. बचाव पथकाला लागणारी सर्व प्रकारची मदत तातडीने पुरवली जाईल.

Comments
Add Comment