Olympic 2036 : ऑलिम्पिक २०३६ च्या आयोजनासाठी भारत सज्ज!

  118

आयओसीकडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा


नवी दिल्ली : यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीत भारतीय खेळाडू व्यस्त असतील, पण भारत सरकारने २०३६ ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची तयारी सुरू केली आहे. २०३० मध्ये युवा ऑलिम्पिक आणि २०३६ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात भारत कोणतीही कसर सोडणार नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले.


भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) २०३६ च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी इच्छा व्यक्त केली, अशा आशयाचे पत्र आयओएने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठवले. सूत्रांनुसार, २०३६ मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची भारताची इच्छा आहे असे पत्र १ ऑक्टोबर २०२४ रोजी ऑलिम्पिक समितीला पाठवण्यात आले आहे. भारत सरकारला आशा आहे की २०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळेल आणि यामुळे संपूर्ण देशामध्ये आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणासाठी फायदा होईल.



पंतप्रधान मोदींचे स्वप्न


२०२३ मध्ये मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी)च्या वार्षिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०३६ उन्हाळी ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी भारत इच्छुक असल्याचे सांगितले. यावेळी ''भारत ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी खूप उत्सुक आहे. २०३६ ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत कोणतीही कसर सोडणार नाही. हे १४० कोटी भारतीयांचे स्वप्न आहे आणि आयओसीच्या पाठिंब्याने आम्हाला हे स्वप्न पूर्ण करायचे आहे.' 'खेळ हा केवळ पदके जिंकण्यासाठी नसून मन जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. खेळ चॅम्पियन्ससोबतच आनंदही देतो,” मोदी म्हणाले.



पत्राद्वारे अनौपचारिक बोली सुरु


भारताने पत्राद्वारे २०३६ ऑलिम्पिकची अनौपचारिक बोली जुलै २०२४ मध्ये लावल्याचे करत आहे. आगामी ऑलिम्पिक आयोजनासाठी आयओाए आणि आयाओसी यांच्यातील संवाद जुलै २०२४ मध्येच सुरू झाला आहे, असे माहितीनुसार समोर आले आहे. २०३६ ऑलिम्पिकचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात येणार असून नवीन प्रकल्पांचे बांधकाम आधीच सुरू झाल्याचे समोर येत आहे.

Comments
Add Comment

पंजाबमध्ये पुराचा हाहाकार, नवोदय विद्यालयात ४०० मुले अडकली; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संताप

गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून

जर्मन वृत्तपत्राचा मोठा दावा: ट्रम्प यांचे ४ फोन, पण पंतप्रधान मोदींनी प्रतिसाद दिला नाही

नवी दिल्ली: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार तणावादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. जर्मन

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस