मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लग्नाआधी अभिषेक बच्चनच्या लग्नाची गोष्ट करिश्मा कपूरसोबत सुरू होती. जया बच्चनने तिला सूनही मानले होते मात्र गोष्ट मध्येच बिघडली आणि लग्न झालेच नाही. अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्यातील अफवेदरम्यान आता जया बच्चन यांचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती करिश्मा कपूरला सून म्हणून बोलावते आणि मुलगा अभिषेक बच्चनसोबत त्यांच्या साखरपुड्याची घोषणा करते.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन गेल्या काही महिन्यांपासून घटस्फोटाच्या अफवेमुळे चर्चेत आहेत. ऐश्वर्याला तिच्या वाढदिवसाला जेव्हा कोणीही सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या नहीत तेव्हा लोकांना ही अफवा खरी वाटू लागली. यातच सोशल मीडियावरील लोक आता बच्चन कुटुंबाच्या भूतकाळातील गोष्टी बाहेर काढत आहेत. तसेच थ्रोबॅक व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर शेअर करत आहेत. ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान जया बच्चन यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
तुम्ही व्हिडिओमध्ये जया, अमिताभ बच्चन, श्वेता नंदा, अभिषेक आणि नव्या नवेलीला एका बुक लाँच इव्हेंटमध्ये पाहू शकते. या इव्हेंटमध्ये जया बच्चनने करिश्मा कपूरसोबत आपल्या मुलाच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. हा साखरपुडा पारही पडला होता. मात्र लग्नापर्यंत ही गोष्ट पोहोचली नाही.
अभिषेक-करिश्माचा साखरपुडा २००३मध्ये तुटला होता.दरम्यान, याचे स्पष्ट कारण समोर आले नाही. मिडिया रिपोर्ट्सनुसार दोन्ही कुटुंबादरम्यान मतभेद आहेत. काही सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार जया बच्चनला वाटत होते की करिश्माने लग्नानंतर अभिनय सोडावा. मात्र त्यासाठी करिश्माची आई बबिता कपूर तयार नव्हती. त्यानंतर करिश्मा कपूरने एका बिझनेसमनसोबत लग्न केले होते.