विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईकरांचे पाणी महागणार

दोन वर्षापासून राजकीय हस्तक्षेपामुळे रखडली पाणीपट्टी वाढ


मुंबई : लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे गेल्या दोन वर्षांपासून पाणीपट्टी वाढ सरकारने रोखून धरली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईचे पाणी महागणार आहे. सुमारे ८ टक्केपर्यंत ही पाणीपट्टी वाढण्याची शक्यता असून याची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पाणीपट्टीत वाढ झाल्यानंतर घरगुती व व्यावसायिक पाणीपट्टीत किमान प्रति एक हजार लिटर मागे ५५ पैसे ते ६ रुपये पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय नियमानुसार ७० टक्के मलनिःसारण शुल्क स्वतंत्र द्यावा लागणार आहे.


जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, प्रचालन व परिरक्षण खर्च, विद्युत खर्च व शासनाच्या भातसा व अप्पर वैतरणा धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या एकत्रिक खर्चाचा आढावा घेतला असता खर्च वाढलेला दिसून आला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून मुंबई महापालिका पाणीपट्टी वाढ करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागत आहे. परंतु निवडणुका लक्षात घेऊन, राज्य सरकारने पाणीपट्टी वाढीस महापालिकेला परवानगी दिली नाही. त्यामुळे पालिकेला किमान ३०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.


प्रतिवर्षी ८ टक्केपर्यंत पाणीपट्टीत वाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने पालिका प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे दरवर्षी १६ जूनपासून पाणीपट्टीत वाढ करण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षापासून राजकीय हस्तक्षेपामुळे रखडलेली पाणीपट्टी वाढ विधानसभा निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)