मुंबई: हिंदू धर्मात तुळशीचे रोप अतिशय पवित्र मानले जात.विविध प्रकारच्या धार्मिक कार्यात तुळशीच्या रोपाचा वापर केला जातो. हिंदू धर्म मानणाऱ्या अनेक लोकांच्या घरात तुळशीचे रोप असते. वास्तुशास्त्रात तुळशीचे रो घरात लावण्याबाबत बरंच काही सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख-समृद्धी, वैभव आणि लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो.
घरात तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मकतेचे वातावरण राहते. तुमच्या घरात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. घरात तुळशीचे रोप लावणे अतिशय शुभ मानले जाते. मात्र तुळशीचे रोप योग्य दिशेला लावणे अतिशय गरजेचे असते.
कधीही तुळशीचे रोप हे मोकळ्या जागेत लावले पाहिजे. यामुळे सूर्याची किरणे त्याला मिळतील. यामुळे तुळशीचे रोप लावण्यासाठी योग्य जागा हे घराचे मुख्य दार अथवा अंगण असते.
घरात एकापेक्षा अधिक तुळशीची रोपे असल्यास त्यांच्या संख्यांवर लक्ष द्या.
नेहमी विषम संख्या म्हणजेच १, ३, ५ अशी रोपे असावीत.
तुळशीच्या रोपांना कधीही रविवारी आणि एकादशीच्या दिवशी स्पर्श करू नये.
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला लक्ष्मी मातेचे प्रतीक मानले आहे. लक्ष्मी माता भगवान विष्णूंसाठी उपवास करते. यामुळे रविवारी रोपाला स्पर्श करू नये.