‘दोन वाजून बावीस मिनिटांनी...’ काय होणार?

राज चिंचणकर


सध्या मराठी नाट्यसृष्टीत एक प्रश्न चर्चिला जात आहे आणि तो म्हणजे ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी...’ नक्की काय होणार? अर्थात याचे कारणही तसेच आहे. लेखक नीरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे ही जोडी एकत्र आल्यावर रंगभूमीवर वेगळे काहीतरी दिसणार याचे सूतोवाच आपसूक होतेच. हीच जोडी आता रंगभूमीवर ‘दोन वाजून बावीस मिनिटांनी...’ हे नवीन नाटक घेऊन येण्यास सज्ज झाली आहे.


या सगळ्यात अजून आकर्षणाचा भाग म्हणजे या नाटकात आदिनाथ कोठारे, प्रियदर्शन जाधव, रसिका सुनील व गौतमी देशपांडे असे आघाडीचे कलावंत भूमिका साकारत आहेत. या नाटकाविषयीची अजून एक औत्स्युक्याची गोष्ट म्हणजे हे नाटक महेश अंबर कोठारे रंगभूमीवर सादर करत आहेत. ‘स्टोरी टेलर्स नूक’ प्रस्तुत, ‘अस्मय थिएटर्स’ची निर्मिती असलेले हे नाटक निर्माते अजय विचारे व आदिनाथ कोठारे रंगभूमीवर आणत आहेत. या नाटकाचे लेखन व नेपथ्य नीरज शिरवईकर यांनी केले असून, दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. अजित परब यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आणि मंगल केंकरे यांची वेशभूषा या नाटकाला लाभली आहे. श्रीकांत तटकरे या नाटकाचे सूत्रधार आहेत. अलीकडेच या नाटकाचा मोठ्या उत्साहात मुहूर्त करण्यात आला असून, हे नाटक आता लवकरच रंगभूमीवर येत आहे.

Comments
Add Comment

मी आणि ‘घासीराम कोतवाल’

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम पुराण इतक्या लवकर आवरतं घेता येईल असं काही वाटत नाही. पण मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक

झेंडे प्लॅटर...!

आसावरी जोशी : मनभावन आपला देश, महाराष्ट्र, मुंबई ... या तिन्हींशी निगडित प्रत्येक चांगली गोष्ट आमच्या घरासाठी

ती आई होती म्हणून...

पितृपक्षाला प्रारंभ झाला की, सर्वांना आपापल्या पूर्वजांची आवर्जून आठवण येते. हे स्वाभाविकच असले, तरी आपल्या

कोकणच्या मातीची मिठ्ठास भ्रमंती...

राजरंग : राज चिंचणकर कोकणचा प्रदेश, तिथला निसर्ग, तिथली माणसे या सगळ्यांत गोडवा ठासून भरलेला आहे. अशा प्रकारची

मी आणि घासीराम कोतवाल

भालचंद्र कुबल : पाचवा वेद घासीराम नव्याने उभे करायचे म्हणजे नेमके काय करायचे याबाबत माझ्या डोक्यात काही

पुढच्या वर्षी लवकर या!

आसावरी जोशी : मनभावन श्यामची आई पुस्तकात आईच्या तोंडी एक वाक्य आहे. अगदी सहज मनास भिडणारे. देवाच्या घरून येणारे