LPG: ऐन दिवाळीत खिशाला ताण, ६२ रूपयांना महागला गॅस सिलेंडर

मुंबई: देशभरात दिवाळीचा उत्साह प्रचंड आहे. त्यात ऐन दिवाळीतच सामान्यांना मोठा झटका बसला आहे. दिवाळीला महागाईचा जोरदार झटका बसला आहे. लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच म्हणजे १ नोव्हेंबरला गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.


१९ किलोग्रॅम वजनाच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात ६२ रूपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, तेल कंपन्यांकडून १४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कमर्शियल गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आजपासून म्हणजेच १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होतील.


आज नोव्हेंबरचा पहिला दिवस आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर ठरवले जातात. तेल कंपन्यांनी शुक्रवारपासून १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात ६२ रूपयांनी वाढ केली आहे.


दिल्लीमध्ये सिलेंडरचे दर - १७४० रूपयांवरून वाढून १८०२
कोलकातामध्ये सिलेंडरचे दर - १८५० रूपयांवरून वाढ १९११.५० रूपये
मुंबईत सिलेंडरचे दर - १६९२ रूपयांवरून वाढून १७५४ रूपये
चेन्नईत सिलेंडरचे दर - १९०३ रूपयांवरून वाढून १९६४ रूपये

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या