Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीBadlapur Fire Accident during Diwali : ऐन दिवाळीत बदलापुरात मोठी दुर्घटना, फटाके...

Badlapur Fire Accident during Diwali : ऐन दिवाळीत बदलापुरात मोठी दुर्घटना, फटाके फोडताना रॉकेट थेट घुसलं बाल्कनीत अन्…

बदलापूर : दिवाळी हा सण आकर्षक रोषणाई, आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो. जगभरात सध्या मोठ्या उत्साहात दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटलं की फटाक्यांची आतेषबाजी आलीच. दिवाळीत फटाके फोडायला लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. दिवाळीत फटाके फोडण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र काहीवेळा फटाके फोडताना आणि दिवे लावताना मोठ्या दुर्घटना होतात. या दुर्घटनांमुळे जखमी होणाऱ्या किंवा मृत्यू होणाऱ्यांची संख्याही अधिक असते. अशातच आता ऐन दिवाळीत बदलापूरच्या खरवई परिसरातील बाल्कनीत रॉकेट घुसल्याने घराला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.

बदलापुरातील खरवई परिसरातील प्रेशियस हेरिटेज इमारतीत फटाके फोडताना उडवलेलं रॉकेट एका घराच्या बाल्कनीत जाऊन पडले. त्यामुळे घराला भीषण आग लागली. यावेळी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यावेळी घरात कुणीही नसल्याने कुणालाही इजा झाली नाही. मात्र घरातील काही साहित्य जळून खाक झालं.

फटाके फोडताना रॉकेट थेट घुसलं बाल्कनीत

गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बदलापूरच्या खरवई परिसरातील प्रेशियस हेरिटेज इमारतीत ही आगीची घटना घडली. या इमारतीबाहेर कुणीतरी फटाके फोडताना उडवलेलं रॉकेट थेट ४०५ क्रमांकाच्या फ्लॅटमधील बाल्कनीत जाऊन पडलं. त्यामुळे बाल्कनीत असलेल्या साहित्याने पेट घेतला. यानंतर तिथे मोठी आग लागली.

बाल्कनीत कपडे, ज्वलनशील पदार्थ ठेवू नये

या आगीमुळे बाल्कनीत असलेली पुस्तकं, सायकल आणि लाकडी साहित्य जाळून खाक झालं. यानंतर इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. यावेळी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर त्यांनी ही आग विझवली. त्यामुळे मोठं नुकसान टळलं. मात्र बदलापुरातील नागरिकांना या घटनेमुळे धक्का बसला आहे. तसेच नागरिकांनी दिवाळीच्या दिवसात घर बंद करून जाताना बाल्कनीत कपडे, ज्वलनशील पदार्थ ठेवू नये, असं आवाहन अग्निशमन दलानं केलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -