मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना अनाजीपंत, महाराष्ट्राचे राजकारण बिघडवणारे नेते म्हणून टीका करणारे संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आणि संजय राऊत यांना महत्त्व देत नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो सध्या चर्चेत आहे. हा फोटो म्हणजे ‘फोटो ऑफ द डे’ आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि संजय राऊत यांची मुलाखत होती. त्या मुलाखतीच्या दरम्यान हे दोन्ही नेते भेटले आणि सदिच्छा भेट झाली. त्यामुळे या ‘फोटो ऑफ द डे ची’ चर्चा रंगली आहे.
ज्या दोन नेत्यांच्या मधून एरवी विस्तवही जात नाही असे दोन नेते म्हणजे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस. ते जेव्हा एकमेकांना हसत खेळत भेटतात आणि हस्तांदोलन करतात तेव्हा चर्चा तर होणारच.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…