AIMIM कडून वारिस पठाण निवडणुकीच्या रिंगणात, या जागेवरून लढवणार निवडणूक

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमद्ये असदुद्दीन औवेसी यांचा पक्ष AIMIM ने भिवंडी पश्चिम येथून आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. वारिस पठाण यांना भिवंडीतून तिकीट देण्यात आले आहे. मलकपेट येथून आमदार अहमद बिन अब्दुल्लाह बलालाने वारिस यांना बी फॉर्म दिला.


AIMIM ने एक्सवर पोस्ट शेअर करताना लिहिले, AIMIM ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून वारिस पठाण यांना उमेदवार निवडले आहे. AIMIM मलकपेटचे आमदार आणि मुंबई प्रभारी अहमद बिन अब्दुल्लाह बलाला यांनी वारिस पठाण यांना बी फॉर्म दिला.


वारिस पठाण यांनी रविवारी उमेदवारांच्या घोषणेबाबत म्हटले होते, मी पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि मी खूप खुश आहे की विचारपूर्वक उमेदवार निवडण्यात आलेत. मला आशा आहे की आम्ही निवडणूक जिंकू. वारिस पठाण यांनी सांगितले होते की सोमवारी इतर उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल. सोमवारी जेव्हा उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली तेव्हा त्यांचेही नाव घोषित करण्यात आले. वारिस पठाण मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.


राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आङे. अशातच राजकीय पक्ष उरलेल्या जागांवर उमेदवार जाहीर करत आहेत. यातच एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Comments
Add Comment

आरक्षणाची अंमलबजावणी पुन्हा लांबणीवर पडणार ?

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन सुरू केले होते. जरांगेंचे आंदोलन

राज्यात नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ सन २०५० पर्यंतचे

राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारण देत बिरेंद्र सराफ

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे आठ महत्त्वाचे निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत

या उद्योगपतीने घेतली पहिली टेस्ला !

मुंबई : आयनॉक्स ग्रुपचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन हे भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत, ज्यांनी ‘इंडिया

मुंबईकरांना दिलासा ! मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू – प्रवास होणार स्वस्त आणि सुलभ

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होणार आहे . शहरात आता इलेक्ट्रिक बाईक