Health: दररोज दही खाणे फायदेशीर आहे का? घ्या जाणून

मुंबई: जर तुमचे आरोग्य निरोगी आहे आणि तुम्ही मर्यादित प्रमाणात दही खात आहात याचे कोणतेही साईड इफेक्ट होणार नाहीत. अशातच जर तुम्ही रात्रीच्या वेळेस दही खात असाल तर यामुळे कफ बनत असेल तर डॉक्टर हे खाण्यासाठी मनाई करू शकतात. अशातच दररोज दही खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया...


दह्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटामिन्स आणि मिनरल्स भरलेले आहेत. अनेकजण दही आवडीने खातात. दही खाल्ल्याने अनेक पोषकतत्वे शरीरास मिळतात. मात्र रोज रोज दही खाणे योग्य आहे का? की यामुळे काही नुकसानही होऊ शकते.


शरीरातील सेल्स वाढवण्यासाठी अमिनो अॅसिडची आवश्यकता असते जे प्रोटीनमधून मिळते. मसल्स, त्वचा, केस, नखे हे सर्व प्रोटीनपासून बनलेले असते. अशातच दररोज शरीराला प्रोटीन देण्यासाठी दही हे चांगले माध्यम आहे. १०० ग्रॅम दही खाल्ल्यास ११.१ ग्रॅम प्रोटीनची पूर्तता होते.


आतड्यांमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे जेवण पचवण्यासाठी मदत करतात. यांची संख्या कायम राखण्यासाठी दही फायदेशीर ठरते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता, ब्लोटिंग, गॅस, पोटात जळजळसारख्या समस्या दूर होतात.


आपल्या शरीरातील हाडांसाठी कॅल्शियम अतिशय गरजेचे असते. याच्या कमतरतेमुळे हाडे कमी आणि कमकुवत होऊ लागतात. अशातच दही खाऊन तुम्ही शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकता. दह्यामध्ये चांगल्या प्रमाणात कॅल्शियम आढळते.


शरीरातील नसांसाठी, मेंदू आणि रक्तासाठी व्हिटामिन बी १२ची गरज असते. हे व्हिटामिन फार कमी पदार्थांमध्ये आढळते. दरम्यान, दही हे दुधापासून बनवलेले असेल तर व्हिटामिन बी १२ मिळते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे