नाशिकमध्ये फिरत होता तोतया आयपीएस अधिकारी!

नाशिक: नाशिकमध्ये तोतया आयपीएस (IPS) अधिकारी बनून एका व्यावसायकाची १ कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिक मधील अंबड पोलीस स्टेशन हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आरोपीने बनावट ओळखपत्रं दाखवून रेल्वेचं बनावट टेंडर मिळवून देण्याचं अमिष दाखवून ही फसवणूक केल्याचं समोर आले आहे. इतकंच नव्हे तर आरोपीने पीडित व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

कशा प्रकारे उघड झाला गैरप्रकार?


विठ्ठल सखाराम वाकडेंनी अंबड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, आरोपी गौरव अच्छेराम मिश्रा याने २०१८ मध्ये त्यांच्याशी ओळख करून घेतली. आरोपी मिश्रा हा स्वतःला भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकारी असल्याचं भासवत होता. तो नेहमी पोलीस गणवेश परिधान करून लाल-निळ्या दिव्यांची गाडीतून फिरत असे. त्याने आपल्याकडे शासनाने दिलेले सुरक्षा रक्षक असल्याचं दाखवून वाकडे यांचा विश्वास संपादन केला. मिश्रा याने वाकडे यांना रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचं अमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळल्याचंही समोर आलं आहे.
Comments
Add Comment

कोल्हापूरमध्ये पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या, पण...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी रात्री विचित्र अपघात घडला. तब्बल पाच ते सहा गाड्यांच्या अपघाताने

बिग बॉस हरुनही मराठमोळा प्रणित मोरे जिंकलाच,सलमान खानसोबत या सिनेमात झळकणार?

Bigg Boss 19 Pranit More मुंबई : बिग बॉस सीझन १९ चा ग्रँड फिनाले नुकसातच झाला. यंदाचा सीझन छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव खन्नाने

PMPML चा पुन्हा कहर; नऊ वर्षांच्या मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू, गरोदर बहीण गंभीर जखमी

पिंपरी-चिंचवड : शहरात अपघातांची मालिका सुरूच असून,एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या

मंदिरांच्या जमिनी वाचवण्यासाठी विशेष कायदा करा!

नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.