Dhanteras 2024: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा उत्तम मुहूर्त कोणता?

  101

मुंबई: यंदा धनत्रयोदशीचा सण २९ ऑक्टोबर २०२४ला साजरा केला जात आहे. या दिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत खरेदी आणि पुजाचा शुभ मुहूर्त आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी आणि भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.


या दिवशी संध्याकाळी प्रदोष कालामध्ये धन्वंतरीसह कुबेर आणि लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. कुटुंबात सुख-समृद्धी राहते. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा यासाठी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी केले जाते. धनत्रयोदशी २०२४ला सोने खरेदीचा काय आहे शुभ मुहूर्त घ्या जाणून...


धनत्रयोदशीला सोने खरेदीसाठी २९ ऑक्टोबर मंगळवारच्या सकाळी १०.३१ मिनिटांपासून ते ३० ऑक्टोबर ६.३२ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असेल. धनत्रय़ोदशीला सोने खरेदीसाठी तुम्हाला २० तास १ मिनिटांचा शुभ काळ मिळत आहे.


धनत्रयोदशीच्या दिवशी लोक सोने, चांदी, ज्वेलरी, गाडी, घर, दुकान खरेदी करतात. याशिवाय झाडू, पितळेची भांडी, इलेक्ट्रॉनिक गोष्टी तसेच धणेही खरेदी केले जातात. चांदीची नाणी, गणपती तसेच लक्ष्मीच्या प्रतिमा खरेदी करणेही शुभ मानले जाते. कोणत्याही प्रकारच्या धातूची खरेदी करणे यादिवशी शुभ मानले जाते.

Comments
Add Comment

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

शेफालीचा पती करतो काय ?

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिनेविश्वात सध्या शोककळा पसरली आहे.वयाच्या अवघ्या

Warren Buffett Donation: आणखी एक ! ९४ वर्षीय वॉरन बफे यांची ६ अब्ज डॉलरची देणगी! २० वर्षांतील सर्वात मोठी....

प्रतिनिधी: एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व सध्या जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत वॉरन बफे (Warren Buffett) यांनी गेल्या