विक्रमगडचा गड राखणार कोण..?

  86

महाविकास आघाडी,महायुतीत चुरशीची लढत होणार


मोखाडा : विक्रमगड विधानसभा मतदारसंघ हा ग्रामीण भागातील मतदार संघ असून आजमितीला जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे याच मतदारसंघातून सुरू आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर वर्चस्व मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्नशील आहेत.२००९ आणि २०१४ ही दोन दशके विक्रमगड मतदारसंघ भाजपा बालेकिल्ला राहिलेला होता. मात्र,२०१९च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सुनील भुसारा यांनी मंत्री पुत्र विद्यमान खासदार डॉ.हेमंत सावरा यांचा मोठ्या फरकाने पराभव करून भाजपाचा बालेकिल्ला ढासळला होता.परंतु गेलेला विक्रमगडचा गड पुन्हा जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून तुल्यबळ उमेदवार देऊन विजयश्री मिळविण्यासाठी योग्य उमेदवार कोण ? असणार हे अजूनही घोषित केलेले.यामुळे महायुतीतील इच्छुक उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहेत.


२०१४ च्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत एकूण मतदारांची संख्या २,४६,४३१ होती. यापैकी १,६५,५२४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता तर ८०,९०७ मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवली होती. या निवडणुकीत भाजपाचे विष्णू सावरा यांना ४०,२०१ मते मिळाली होती तर शिवसेनेचे प्रकाश निकम यांना ३६,३५६ मत मिळाली होती. तसेच आताचे विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना तिसऱ्या क्रमांकाची ३२,०५३ इतकीच मत मिळाली होती.या निवडणुकीत विष्णू सावरा यांनी शिवसेनेचे उमेदवार प्रकाश निकम यांचा ३८४५ मतांनी पराभव केला होता.चौथ्या क्रमांकावर बहुजन विकास आघाडीचे हेमंत गोविंद यांना १८०८५ एवढी मत मिळाली होती.मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणाचे चित्र पुर्ण बदलून गेले आणि भाजपाच्या परंपरागत बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी सुरुंग लावून आपला विजयश्री खेचून आणला होता.


२०१९ च्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेत एकूण मतदारांची संख्या २,६६,५७६ होती यापैकी १,८२,८४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.तर ८३,७३५ मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठफिरवली होती.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे सुनील भुसारा यांना ८८,४२५ मत मिळाली होती.तर भाजपाचे हेमंत सावरा यांना ६७,०२६ एवढी मत मिळाली होती.या निवडणुकीत सुनील भुसारा यांनी २१ हजार ३९९ मतांनी भाजपाचे हेमंत सावरा यांचा पराभव केला होता.निवडणुकीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची ८ हजार ४९५ मते कोण्या एका राजकीय पक्षांच्या नेत्याला न मिळता नोटा समोरील बटण दाबून मतदार राजाने आपली नाराजगी व्यक्त केली होती.त्यामुळे याही निवडणुकीत मतदारांना आपला योग्य उमेदवार आवडतो का ? की मागील निवडणुकीतील नोटांच्या मताची आकडेवारी वाढते की काय अशी शंका उपस्थित होत आहे.


यावर्षीच्या ही निवडणुकीत महाविकास आघाडी कडून इच्छुकांची गर्दी नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे तिकीट विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना मिळाले असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मात्र महायुती मध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दावेदारी दाखल केल्यामुळे विक्रमगड विधानसभेतील महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नाही..

Comments
Add Comment

वादग्रस्त विधाने करू नयेत, सर्वांनी समन्वयाने काम करावे - आमदार दीपक केसरकर

सिंधुदुर्ग - महायुतीची सध्याची राजकीय परिस्थिती चांगली असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची वादग्रस्त

समृद्धीवर वेगमर्यादेचे उल्लंघन, आता असणार सीसीटीव्हीची नजर

अमरावती : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; विरोध करणाऱ्यावर होणार कायदेशीर कारवाई

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत