ज्येष्ठांना १० नोव्हेंबरपासून घरातूनच करता येईल मतदान

  124

सोलापूर: विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करता येणार आहे, पण त्यासाठी त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे एक अर्ज द्यावा लागतो. तो अर्ज देण्याची मुदत २२ ते २६ ऑक्टोबरपर्यंत आहे. घरबसल्या मतदान करण्याचा पर्याय निवडलेल्या ज्येष्ठांना १० नोव्हेंबरपासून मतदान करता येणार आहे. त्यासाठी चौघांचे पथक त्यांच्या घरी जाईल. सोलापूर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील ५२ हजार ७९६ मतदार आहेत.२०१९च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, बार्शी या चार मतदारसंघातील आमदार अवघ्या पाच हजारापेक्षा कमी मताने विजयी झाले होते. त्या निवडणुकीतील बहुतेक विजयी उमेदवारांचे मताधिक्य पाहता यंदाच्या निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातील लढती काठावरील आहेत, त्या उमेदवारांसाठी ८५ वर्षांवरील ज्येष्ठांचे मतदान निर्णायक ठरणार आहे.

करमाळा, माढा, बार्शी, मोहोळ, पंढरपूर या पाच मतदारसंघातील ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या पाच ते सहा हजारांपर्यंत आहे. त्यामुळे या मतदारांची यादी घेऊन उमेदवार त्यांच्यापर्यंत पोचण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांची संख्या, बंडखोरी पाहता ज्येष्ठांच्या मताला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments
Add Comment

Sambhajinagar Illegal Construction: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध बांधकामावर हातोडा; अतिक्रमणविरोधी मोहीम पुन्हा सुरू

विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने दोन दिवसांच्या

OBC reservation : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार!

२७ टक्के ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता