‘ईडी’चे देशभरात १३ ठिकाणी छापे

‘कोल्ड प्ले’ आणि ‘दिलजीत कॉन्सर्ट’च्या तिकीट काळाबाजार प्रकरणी ईडीच्या दिल्ली, मुंबई, जयपूर, चंदीगड, बंगळुरू येथे धाडी

मुंबई : ‘कोल्ड प्ले’ आणि ‘दिलजीत कॉन्सर्ट’च्या तिकीट काळाबाजारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दिल्ली, मुंबई, जयपूर, चंदीगड, बंगळुरू येथे छापे टाकले. ‘ईडी’ने १३ ठिकाणी छापे टाकले असून तिकिटांच्या बेकायदा विक्रीसाठी समाज माध्यमांचा वापर करण्यात आल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे.


दिलजीत दोसांझचा ‘डिल्युमिनाटी’ आणि ‘कोल्डप्ले’च्या ‘म्युझिक ऑफ द स्पीअर्स वर्ल्ड टूर’चे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांना चाहत्यांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमांची अधिकृत तिकीट विक्री ‘बुक माय शो’ आणि ‘झोमॅटो लाईव्ह’मार्फत करण्यात आली. पण काही मिनिटांतच तिकिटांची विक्री झाली. त्यानंतर या तिकीटांची काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री सुरू आहे. त्याच्या माध्यमातून देशभरात चाहत्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. अनेक चाहत्यांना बनावट तिकीटे विकण्यात आली. वैध तिकिटांसाठी त्यांच्याकडून अधिक रक्कम घेण्यात आली.


‘बुक माय शो’ने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

देशभरातील विविध राज्यांमध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. ‘बुक माय शो’नेही याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे काही संशयितांविरोधात तक्रार केली आहे. ‘कोल्डप्ले कॉन्सर्ट’ तिकीट काळाबाजारप्रकरणी ‘बुक माय शो’ने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात काही संशयित व्यक्ती बनावट तिकीट विक्री किंवा कॉन्सर्टच्या तिकिटांची वाढीव किंमतीने विक्री करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


तक्रारीमध्ये कोणाचेही थेट नाव दिले नसले तरी ३० संशयितांची नावे, मोबाइल क्रमांकांचे मालक, समाज माध्यमांवरील खाते आणि संकेतस्थळ यांची माहिती देण्यात आली आहे. या संशयितांनी वाढीव दराने तिकिटांची पुनर्विक्री केल्याचा आरोप आहे. ‘बुक माय शो’च्या विधि विभागाचे महाव्यवस्थापक पूनम मित्रा यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ३१८ (४), ३१९ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६ (क) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.


इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम या समाज माध्यमांद्वारे बेकायदा तिकिटांची विक्री

‘ईडी’ने याप्रकरणी देशभरात दाखल गुन्ह्यांच्या आधारावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक अधिनियम २००२ (पीएमएलए) अंतर्गत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ‘ईडी’ने शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) दिल्ली, मुंबई, जयपूर, बंगळुरू आणि चंदीगड येथे १३ हून अधिक ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत बनावट तिकिटांच्या विक्रीशी संबंधित संशयित व्यक्तींचे मोबाइल फोन, लॅपटॉप, सिम कार्ड इत्यादी माहिती आणि सामग्री जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत बेकायदा तिकीट विक्रीच्या जाळ्याचा तपास आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात येत असल्याचे ‘ईडी’कडून शनिवारी सांगण्यात आले. याप्रकरणी इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम या समाज माध्यमांद्वारे बेकायदा तिकिटांची विक्री करण्यात आल्याचे समजते. याबाबत ‘ईडी’ अधिक तपास करीत आहे.

Comments
Add Comment

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदेंना कोर्टात आली भोवळ, उपचारादरम्यान मृत्यू

नवी दिल्ली: दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडच्या राजधानीत ढगफूटी! घरं, गाड्या आणि दुकाने खेळण्यांसारख्या गेल्या वाहून

डेहराडून: उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटीने कहर केला आहे. उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडून येथील

Google Gemini Nano Banana AI trend : मुलींनो सावधान! गुगल जेमिनाय’मध्ये फोटो करताय? IPS अधिकाऱ्याने दिला धक्कादायक इशारा, नक्की वाचा

‘गुगल जेमिनाय’च्या (Google Gemini) नॅनो बनाना एआय फीचरने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. असंख्य नेटकरी आपले फोटो

Income Tax Return भरणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी...

नवी दिल्ली: प्राप्तिकर विभागाने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स