Pushpa 2 : पुष्पा २'ची रिलीज डेट पुन्हा बदलली! नवी तारीख आली समोर

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लु अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या (Rashmika Mandanna) ‘पुष्पा २: द रुल’ (Pushpa 2 The Rule) या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बहुप्रतिक्षित चित्रपट असलेल्या 'पुष्पा २: द रुल' बाबत सातत्याने नवीन अपडेट्स समोर येत आहेत. १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार ६ डिसेंबर रोजी पुष्पा २: द रुल' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता पुन्हा प्रदर्शनाची तारीख बदलण्यात (Pushpa 2 Release Date) आली आहे. त्यामुळे चाहत्यांना ६ डिसेंबर आधीच पुष्पा २ चित्रपट पाहायला मिळणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा २ चित्रपट प्री-पोन करण्यात आला आहे. हा चित्रपट आता एक दिवस आधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हैदराबादमध्ये एका मोठ्या कार्यक्रमात चित्रपटाच्या निर्मात्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली. त्यानुसार पुष्पा २ चित्रपट ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



रिलीजच्या आधीच कोट्यवधींची कमाई


पुष्पा २ चित्रपटाने रिलीजच्या आधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने १०८५ कोटींचे प्री-रिलीझ कलेक्शन जमा केले आहे. डिसेंबरपर्यंत हा आकडा आणखी वाढून रेकॉर्डब्रेक कमाई करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


Comments
Add Comment

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी