‘असा’ करा अर्ज
मुंबई : सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (NSCL Recruitment) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबतची अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार असून ३० नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
कोणत्या पदांची भरती?
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये १८८ रिक्त पदांसाठी भरती जारी केली आहे. यामध्ये उप महाप्रबंधक, सहायक प्रबंधक, एचआर पदांसाठी भरती केली जाणार आहे.
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना indiaseeds.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. तसेच अर्ज शुल्क देखील भरावे लागणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
या नोकरीसाठी उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला असावा.