Cyclone Dana : पूर्व किनापट्टीवर धडकले दाना चक्रीवादळ!

ओडिशा, बंगालमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस


१४ जिल्ह्यांमधील सुमारे दहा लाख लोकांचे केले स्थलांतर


भुवनेश्वर : ‘दाना’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या बहुतांश भागांतून नैऋत्य मौसमी पाऊस माघारी फिरला असताना आता पूर्व किनारपट्टीवर या वेगवान वादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘दाना’ चक्रीवादळ आता ओडिशाच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीनंतर ते ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज आहे. दरम्यान किनारपट्टी भागात याचा परिणाम सुरू झाला असून ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. तर चक्रीवादळानंतर वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटरपेक्षाही अधिक असेल.


बंगालच्या उपसागरात उगम पावलेले ‘दाना’ हे चक्रीवादळ ओडिशातील भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ उतरेल. ही प्रक्रिया किमान पाच तास तरी चालेल आणि त्यानंतर ओडिशाच्या उत्तरेकडील भागातून हे चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटर वेगाने पुढे जाईल. दरम्यान, या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. ओडिशातील १४ जिल्ह्यांमध्ये सुमारे दहा लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे दोन दिवसांपासून विमानाची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर रेल्वेदेखील रद्द करण्यात आल्या आहेत. पर्यटकांना येथून परत पाठवण्यात आले आहे.


दरम्यान, महाराष्ट्रात देखील पुढील २४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.



‘दाना’मुळे विमान सेवेवर १६ तासांसाठी बंदी


'दाना' या वादळामुळे ५०० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विमानांना १६ तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. 'दाना' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने ओडिशा आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये एकूण ५६ टीम तैनात केल्या आहेत. डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना त्यांच्या संबंधित आरोग्य केंद्रात परत बोलावण्यात आले आहे.



महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी बरसण्याची शक्यता


'दाना' चक्रीवादळाचा चार राज्यांना धोका आहे. तर महाराष्ट्रातही ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडत आहे. मुंबईतील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर येत्या २ ते ३ दिवसात महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या