चंद्रकांत पाटलांचे रोहिणी खडसेंना आव्हान

जळगाव (प्रतिनिधी) : राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून, सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. आज मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रकांत पाटील यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्यासोबत लढत होणार आहे. ४० वर्षांनंतर प्रथमच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आली आहे.


मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाची उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती, तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार असून त्यांच्या विरोधात चंद्रकांत पाटलांची लढत होणार आहे. एकनाथ खडसे यांचं या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होते. मात्र, एकनाथ खडसेंचा हा गड भेदण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीचा शुभारंभ हा मुक्ताईनगरमध्ये केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा

तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडू नये ! - महसूलमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना

महसूल विभागाचा ‘डिजिटल’ कायापालट! मुंबई :  छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा

मुंबई पालिका निवडणुकीसाठी १५० जागांवर महायुतीचे एकमत

अमित साटम यांची माहिती; नवाब मलिकांऐवजी अन्य कोणाकडे नेतृत्व दिल्यास राष्ट्रवादीचे महायुतीत स्वागत मुंबई :

महायुतीच्या विजयासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये महायुतीच्या उमेदवारींच्या विजयाची जबाबदारी देण्यासाठी शिवसेनेची

अंबरनाथ, बदलापूरच्या विकासाला चालना देणार, पुढच्या चार महिन्यात मेट्रो १४ चे काम सुरू होणार

अंबरनाथ : मुंबई महानगर क्षेत्रात दोन लाख कोटींची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून अंबरनाथ,

राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री

मुंबई : काँग्रेस - राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना शासकीय कोट्यातल्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात मंत्री