मुंबई: ९०च्या दशकात सुरू झालेला एक प्रसिद्ध टेलिव्हिजन शो म्हणजेच CID. CIDचा चाहता वर्ग प्रचंड आहे. तुम्हीही CIDचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. खरंतर हा शो पुन्हा टीव्हीवर येत आहे. खरंतर, CIDचा सोनी टीव्ही ऑफिशियलच्या इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रत्येकजण हेच म्हणत आहे हा सीआयजीचा प्रोमो आहे.
प्रोमोमध्ये शिवाजी साटम उर्फ एसीपी प्रद्युम्न यांची एक झलक पाहायला मिळत आहे. ते हातात छत्री घेऊन पावसात गाडीच्या बाहेर येताना दिसत आहेत. त्यातच त्यांच्या कपाळावरून रक्त गळताना दिसत आहे. चाहत्यांमध्ये हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. टीव्हीवर प्रसारित झालेला हा सर्वात दीर्घकाळ चालणारा शो आहे.
View this post on Instagram
सोनी टीव्हीने जो प्रोमो शेअर केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये लिहिले की, कॅलेंडर्स मार्क करून घ्या. कारण २६ ऑक्टोबरला एक धमाकेदार प्रोमो ड्रॉप होत आहे. सीआयडी हा शो २०१८ पर्यंत टीव्हीवर सुरू होता. शिवाजी साटम उर्फ एसीपी प्रद्युम्न, आदित्य श्रीवास्तव उर्फ इन्स्पेक्टर फ्रेडरिक्त आणि नरेंद्र गुप्ता उर्फ डॉक्टर साळुंखे यात लीड रोलमध्ये दिसले. १९९८मध्ये हा शो टीव्हीवर सुरू करण्यात आला होता. २० वर्षे हा शो चाहत्यांमध्ये लोकप्रिय होता.