भाजपाच्या २६ उमेदवारांचे अर्ज दाखल

Share

महायुतीच्या कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या एकूण २६ उमेदवारांनी उमेदवारी दाखल करण्याच्या पाहिल्याच दिवशी गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधत गुरुवारी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित आदींचा समावेश आहे. यावेळी या उमेदवारांसोबत उपस्थित राहून भाजपा आणि महायुतीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले.

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पराग अळवणी यांनी गुरुवारी विमानतळ कॉलनी येथील समाजकल्याण हॉल येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दरेकर, उत्तर प्रदेशचे आमदार डॉ. रतन पाल सिंह, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मेहता आणि शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सुभाष कांता सावंत उपस्थित होते. अंधेरी पश्चिम मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अमित साटम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजपा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बांदेरी, शिवसेना विभाग प्रमुख अलताफ पेवेकर, संघटक पराग कदम, माजी नगरसेवक अनिश मकवाने, रोहन राठोड, सुधा सिंह आदि उपस्थित होते. मुलुंड मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मुलुंड पूर्व येथील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मुलुंड विधानसभेचे प्रभारी आणि उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार शलभ मणी त्रिपाठी, माजी खासदार मनोज कोटक, किरीट सोमैय्या, माजी आमदार प्रकाश मेहता, शिवसेना विभागप्रमुख जगदीश शेट्टी आदी उपस्थित होते. कांदिवली पूर्व मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकूर कॉम्प्लेक्स येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. मलबार हिल मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोथरूड येथून चंद्रकांतदादा पाटील, मुंबईत वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर, शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल, नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित, धुळे मतदारसंघातून अनुप अगरवाल, शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा, धामणगाव रेल्वे मतदारसंघातून प्रताप अडसड, हिंगणघाट मतदारसंघातून समीर कुणावार, गोंदिया मतदारसंघातून विनोद अग्रवाल, राळेगावमधून डॉ. अशोक उके, किनवटमधून भीमराव केराम, हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे, बदलापूर येथून नारायण कुचे, गंगापूर येथून प्रशांत बंब, शिर्डीतून राधाकृष्ण विखे-पाटील, तुळजापूर येथून राणा जगजीतसिंह पाटील, सोलापूर दक्षिण येथून सुभाष देशमुख, कराड दक्षिण येथून अतुल भोसले, कोल्हापूर दक्षिण येथून अमल महाडिक आणि सुधीर दादा गाडगीळ यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शहादा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजेश पाडवी यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत भाजपा प्रदेश सरचिटणीस विजयभाऊ चौधरी, जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

53 minutes ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

1 hour ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

2 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

3 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

3 hours ago