Jaya Bachchan Mother Death: जया बच्चन यांना मातृशोक; इंदिरा भादुरी यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jaya Bachchan Mother Death: बॉलिवूडमधील अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या आई आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या सासूबाई इंदिरा भादुरी यांचं निधन झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी इंदिरा भादुरी यांनी अखेरचा श्वास घेतलाय. इंदिरा भादुरी यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून चिंताजनक होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, अशी माहिती सध्या समोर येत आहे. बच्चन कुटुंबावर इंदिरा भादुरी यांच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


मंगळवार रात्री इंदिरा भादुरी यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे अमिताभ तातडीने भोपाळच्या दिशेने रवाना झाले. जया बच्चनसुद्धा भोपाळमध्ये पोहचल्या होत्या. मात्र, इंदिरा यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली आणि भोपाळमधल्या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Comments
Add Comment

Borivali National Park Toy Train : वनराणी इज बॅक! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा धावणार!

मुंबई : बोरिवलीच्या निसर्गरम्य संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजपासून 'वनराणी' पुन्हा एकदा पर्यटकांच्या

मुंबईकरांसाठी मोठी संधी! म्हाडाची २५०० घरांची लॉटरी, तारीख झाली जाहीर

मुंबई : मुंबईत स्वतःचे घर असावे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र वाढत्या मालमत्ता दरांमुळे सर्वसामान्यांना घर

पश्चिम रेल्वेवर आज - उद्या 'मेजर ब्लॉक'

लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल मुंबई  : पश्चिम रेल्वेवर परिचालन कार्य आणि प्रभादेवी रोड ओव्हर

गॅसनंतर आता 'पाणी'ही महाग?

बाटलीबंद पाण्याच्या दरात घाऊक बाजारात वाढ मुंबई  : इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे

मराठी न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक आहे. एखाद्या शाळेत मराठी शाळा शिकवली

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा