Mumbai Local : रेल्वे गर्दीचा आणखी एक बळी! लोकलमधून पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

  241

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांचा रेल्वे प्रवास (Mumbai Railway) जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात मुंबई लोकलच्या गर्दीमुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा अशीच घटना अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे.


कर्जत येथे राहणारी ऋतुजा गणेश जंगम हिचा मंगळवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास लोकल ट्रेनच्या गर्दीमुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



नेमके घडले काय?


ऋतुजा ट्रॅव्हल कंपनीत कामाला होती. ती ठाण्याहून कर्जत लोकलने परतत असताना अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीच्या रेट्यामुळे खाली उतरली. पण घरी जायला उशीर झाला हे लक्षात येताच ती पुन्हा त्याच लोकलमध्ये चढली. पण गर्दीमुळे तिला आतमध्ये शिरताच आले नाही. त्यामुळे ती दारातच उभी राहिली. मात्र अंबरनाथ स्थानकातून ट्रेन सुटताच अवघ्या काही अंतरावर गर्दीमुळे तिचा हात सटकला आणि ती खाली पडली.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांनी प्रवासावेळी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी