सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ९१० प्राप्त तक्रारींपैकी ८९९ निकाली

  36

३४ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त


मुंबई: राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण ९१० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.


सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.


राज्य शासन व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३४ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक, शिवभक्तांचा उत्साह

ब्रह्मगिरी फेरीसाठी मोठी गर्दी नाशिक (प्रतिनिधी): बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या

Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

जमीन विक्रीस हरकत घेणा-या आईचा गळा घोटला; नंतर केली आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने