नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील अनेक विमान कंपन्यांना विमान बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यामुळे हवाई वाहतूक विभाग, विमानतळ आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अशातच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे.
शीख दंगलीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही एअर इंडियाच्या विमानांवर हल्ला करु. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी १ ते १९ नोव्हेंबर दरम्यान एअर इंडियातून प्रवास करु नये, अशी धमकी पन्नूने दिली आहे.
शीख फॉर जस्टिस या संघटनेची स्थापना करणारा पन्नू हा नेहमी भारताविरोधात गरळ ओकत आहे. खलिस्तानच्या नावाखाली लोकांना भडकावल्यामुळे भारताने पन्नूला दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्यावर फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचा आणि पंजाबी शीख तरुणांना शस्त्रे घेण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पन्नू याला केंद्र सरकारने २०२० मध्ये, बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्या शीख फॉर जस्टिस वरही बंदी घालण्यात आली आहे.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…