डोंबिवली : BJP ने आपली पहिली यादी रविवारी (ता. २० ऑक्टोबर) जाहीर केल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष हळूहळू आपापल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करू लागले आहेत. सर्वच पक्षातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याआधीच आपली काही नावे सभांच्या माध्यमातून जाहीर केली आहेत. त्यानंतर आता डोंबिवलीमधील एका कार्यक्रमातून त्यांनी आपल्या विद्यमान आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव या दोन शिलेदारांच्या नावांची घोषणा केली आहे. आमदार राजू पाटील (Raju Patil) यांच्या कार्यालयाचे डोंबिवली येथे सोमवारी (ता. २१ ऑक्टोबर) उद्घाटन करण्यात आले. राज ठाकरे या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. तर आज किंवा उद्या मनसेकडून अधिकृतपणे यादी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन केले. मनसैनिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. राज ठाकरे यांनी या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. आज किंवा उद्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होईल. पण त्याआधी कल्याण ग्रामीणमधून मी राजू पाटील (Raju Patil) आणि ठाण्यातून अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांची उमेदवारी जाहीर करतो आहे. मी दोघांचे उमेदवारी अर्ज येत्या २४ तारखेला भरण्यासाठी येत आहे”, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
मनसेने लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता. आता विधानसभेसाठी महायुती सोबत न राहता राज ठाकरे यांनी स्वतंत्र भूमिका घेऊन आपले उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या काळात महायुतीबरोबर असणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवारांचा सामना आता भाजपा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाबरोबर असणार आहे.
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…