नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीमध्ये गेले होते. या तिन्ही नेत्यांची अमित शाहा यांच्यासोबत रात्री उशिरा एक बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७० आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ६० जागा मिळणार असल्याची माहिती आहे. भाजपाच्या कोट्यातूनच मित्रपक्षांना जागा दिल्या जाणार आहेत. पुढील २४ तासात जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.
ज्या जागांवर वाद चालू होता, तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये महायुतीला ब-यापैकी यश आल्याचे म्हटले जात आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडलेली ही बैठक एकूण अडीच तास चालली. जागावाटपाचा तिढा अमित शाह यांच्या समक्ष सोडवण्यात आला असून आता फक्त काहीच जागांचा प्रश्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महायुतीचे भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाला कमीत कमी १५० जागा हव्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ९० जागांची मागणी होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कमीत कमी ६० जागा हव्या आहेत. असे असताना जागावाटपाची ही चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
असे असले तरी, महायुतीत एकीकडे जागावाटपावर चर्चा चालू आहे. मात्र दुसरीकडे महायुतीतील तिन्ही पक्षांपुढे अंतर्गत बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. ब-याच मतदारसंघांसाठी महायुतीत एकापेक्षा जास्त नेते इच्छुक आहे. या नेत्यांची त्या-त्या मतदारसंघांत तयारीदेखील चालू आहे. त्यामुळे एका पक्षाला जागा सुटल्यास दुस-या पक्षातील नेत बंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाल्यास बंड शांत करण्याचे आव्हान महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांपुढे असणार आहे.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…