Ajit Pawar : अजितदादांनी केली इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमधून उमेदवाराची अप्रत्यक्ष घोषणा; नाशिकमध्ये काँग्रेसवर केला जबरदस्त हल्लाबोल

Share

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजलं आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नाशिकच्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात (Igatpuri-Trimbakeshwar Assembly Constituency) पहिली सभा पार पडली. इगतपुरी मतदारसंघाचे हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) हे आमदार आहे. नुकताच हिरामण खोसकर यांनी काँग्रेसला (NCP) रामराम करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. काँग्रेसकडून हिरामण खोसकर यांच्यावर क्रॉस व्होटिंगचा आरोप करण्यात आला होता यावरून अजित पवार यांनी काँग्रेसवर (Congress) जबरदस्त हल्लाबोल केला आहे. त्यानंतर राजेश पाटील, हसन मुश्रीफ यांच्यानंतर हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीची अजित पवार यांनी अप्रत्यक्ष घोषणा केली आहे.

अजित पवार म्हणाले की, दोन-तीन दिवसांपूर्वी हिरामण खोसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगिरी बंगल्यावर प्रवेश केला. आता इतरांचा होणार आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी आम्ही चालतो. एकमेकांच्या बाबतीत आम्ही सन्मान ठेवतो. जाती-पाती आम्ही मानत नाही. काही वाचाळवीर कधीही काही तरी बोलतात ते आपल्या महाराष्ट्रला न पटनारे असते. परंतु हाताची पाची बोटं सारखी नसतात, आम्ही त्याचा त्याच वेळी निषेध करत असतो. ज्यांनी प्रवेश केला त्यांना आगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो, अशा प्रकारची वेळ आम्ही तुमच्यावर येऊ देणार नाही हा माझा शब्द आहे. असं अजित पवार यांनी म्हंटलय.

काँग्रेसने हिरामण खोसकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला

आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलो, दोन भावंडं वेगळी झाले तसे ते सुद्धा झाले. तो काळ १९९९ चा होता. हिरामण खोसकर यांना अलीकडच्या काँग्रेसने अनेकवेळा बदनाम करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मला जिथे मत द्यायला सांगेन, तिथेच मत देणार असे हिरामण खोसकर बोलले होते. आम्ही त्यांना काही सांगितले नाही. हिरामण खोसकर यांचा स्वभाव सर्वांमध्ये मिसळून राहण्यासारखा आहे. विकासाच्या कामासाठी ते आमच्याकडे येत होते. आम्ही ५४ आमदार निवडून आलो होतो, पण त्यात हिरामण खोसकर यांचे ५५ वे नाव होते, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

अजित पवारांचे नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याबाबत आश्वासन

अजित पवार पुढे म्हणाले की, कधीच मी दुजाभाव केला नाही. राज्याचे आम्ही उपमुख्यमंत्री आहोत. मूठभर लोकांचे नाही. नरहरी झिरवाळ आणि हिरामण खोसकर हे दोघे जुळे भाऊ असल्याचे शहरी भागातील लोकांना वाटते. आता परतीचा पाऊस पडतोय. त्यामधून भाताचे नुकसान होतं आहे. बऱ्याच पिकांच्या नुकसान होतंय. तुम्ही त्या ठिकाणी पंचनामे करायला सांगा, आचारसंहिता जरी असली तरी हे नैसर्गिक संकट आहे. पिकविम्याचे पैसेसुद्धा लोकांना मिळायला लागले आहेत. वरिष्ठांना आता सांगितले जाईल, याबाबत पंचनामे होतील, असे अजित पवारांनी आश्वासन दिले.

महायुतीच्या उमेदवाराचे बटन दाबा

लोकसभा निवडणुकीत आम्ही किंमत मोजली. आम्ही कांदा प्रश्नावर मोदी, अमित शाह यांना भेटलो. निर्यातबंदी उठवा, आता कांद्याला जास्त भाव आला आहे, असे त्यांनी सांगितले. २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. महायुती, महाविकास आघडी, मनसे, हौशे नवशे गवसे सगळे उभे राहतील, शेवटी लोकशाती आहे. पण तुम्ही महायुतीच्या उमेदवाराचे बटन दाबा, असे आवाहन अजित पवारांनी उपस्थितांना केलं आहे.

आता का पोटात दुखतंय?

लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्वांना मिळत आहेत. माय माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो आहे. आता ही योजना बंद होणार नाही आहे. सावत्र भावाचे बटन दाबू नका, आम्ही सख्खे भाऊ आहोत. योजनेचे पैसे बंद होणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. तुमचं सरकार असताना तुम्ही कधीच काहीही केले नाही, आता का पोटात दुखतंय? योजना बंद करायला तुमच्या घरची योजना आहे का? असा सवाल देखील अजित पवार यांनी तिथे उपस्थित केला.

महायुतीला म्हणजेच हिरामण खोसकर यांना निवडून द्या

आता निवडणुकीचा काळ आहे. आम्ही कुंभमेळ्याच्या कामात लक्ष घालू. काम करून घेण्याची धमक असावी लागते, प्रशासनावर पकड असावी लागते. अनेक लोक आमच्याकडे येतात. काहींनी आता असं काढलंय की, योजना बंद केली, योजना बंद केलेली नाही. केंद्रातून आम्ही निधी आणू. आम्ही शेतकऱ्यांना आणि कोणालाच वाऱ्यावर सोडणार नाही. विरोधक सत्तेत आले तर ही योजना बंद पाडतील. आर्थिक परिस्थिती राज्याची भक्कम आहे. महाराष्ट्राची बदनामी विरोधकांनी थांबावावी. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे विरोधक म्हणतात. पण मी अर्थमंत्री आहे, मला माहिती आहे. फक्त सत्तेत येण्यासाठी राज्याची बदनामी करू नका, अशी टीका यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर केली. तर महायुतीला म्हणजेच हिरामण खोसकर यांना निवडून द्या, असे म्हणत अजित पवारांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातून हिरामण खोसकर यांच्या उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा केली.

Recent Posts

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

5 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

11 minutes ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

12 minutes ago

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

36 minutes ago

Curd: दह्यासोबत या गोष्टी खाल्या तर, पोटात विष तयार होईल!

मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…

1 hour ago

Mahesh Babu : तेलुगू सुपरस्टार महेश बाबूला मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स

हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…

1 hour ago