बिष्णोई गँगकडून सलमान खानला धमकी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. मात्र बाबा सिद्दीकी यांच्यावर जीवघेणा हल्लानंतर आता लॉरेन्स बिष्णोई गँगने (Lawrence Bishnoi) पुन्हा एकदा सलमान खानला (Salman Khan) धमकी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काळवीट हत्येप्रकरणी ताणला गेलेला वाद गंभीर वळणावर पोहोचला आहे. बिष्णोई गँग आणि या गँगशी संबंधित असणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या एका जवळील व्यक्तीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला संदेशाच्या माध्यमातून सलमान खानला धमकी दिली आहे.
धमकीच्या मेसेजमध्ये काय म्हटले?
मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक धमकीचा मेसेज आला. यामध्ये लॉरेन्स बिष्णोईशी असलेले वैर संपवण्यासाठी अभिनेता सलमान खानकडे ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्याने पैसे दिले नाही तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल असा इशारा दिला आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्याचबरोबर संरक्षण यंत्रणाही आता अधिकच सतर्क झाली आहे.