Sunday, May 11, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Pune News : विरुद्ध दिशेने गाडी चालवल्यास वाहन सहा महिन्यांसाठी होणार जप्त!

Pune News : विरुद्ध दिशेने गाडी चालवल्यास वाहन सहा महिन्यांसाठी होणार जप्त!

पुणे : पुणे शहरात वर्दळीच्या कालावधीत अवजड वाहनांवरील बंदीची वाहतूक पोलिसांकडून कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, ट्रिपल सीट, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत सुमारे २५ हजार वाहनचालकांवर कारवाई केली असून, दोनशेहून अधिक वाहने जप्त केली आहेत.


विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास सहा महिन्यांसाठी वाहन जप्त करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.शहरात भरधाव आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यात विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर वचक राहावा, यासाठी वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत दोनशेहून अधिक वाहने जप्त करण्यात आल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

Comments
Add Comment