स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी'त बिघाडीच होणार; मविआतील वादावरून शिंदेंची टीका

  48

महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे आणि त्यात बिघाडी होणारच आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावात गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौऱ्याच्या धावपळीतसुद्धा गाईंच्या गोठ्यात जाऊन तेथील गाईंना चारा खायला घातल्याचं पाहायला मिळालं.


यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, ''देवाला काही मागावं नाही लागत, दडवाला सगळं माहित आहे. बळिराजाला चांगले दिवस येऊ देत असं मागणं मागतो. बळिराजाचा सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार आहे. महाराष्ट्रातील लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना केल्या आहेत. महाविकास आघाडीची अडिच वर्षांची कारकिर्द आणि महायुतीची दोन ते सव्वादोन वर्षांची कारकिर्दची तुलना तुम्ही कराच. जनतेच्या समोर जातोय दुध का दुध पाणी का पाणी आता जनताच करेल. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महायुतीला पोहोच पावती देईल. आता महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कोणाला किती जागा मिळणार आहेत हे दोन दिवसांत ठरेल. सगळ्या गोष्टी सन्मानानं होतील. मुख्यमंत्रीपदासाठी विरोधकांकडे सगळे गल्लीत आणि दिल्लीत फिरत आहेत. महाविकास आघाडी ही फक्त स्वार्थासाठी झालेली आघाडी त्यात बिघाडीच होणार आहे. बाळसाहेबांचे विचार त्यांनी सोडले आहेत, त्यांना पराभव दिसत आहे त्यामुळे आता त्यांना सगळ्यात घोळ दिसत आहे, अशी टीका शिंदेनी केली आहे.


दरम्यान, शरद पवारांच्या पक्षाने ठरवावं मुख्यमंत्री कोण हा त्यांचा अधिकार आहे. महायुतीलाच जनतेचा कौल असल्याने त्यांनी आता विरोधी पक्ष नेत्याचा उमेदवार ठरवायला हवा. आमच्यात कोणताच वाद नाही आम्ही आमच्या कामाला आणि विकासाला महत्व देतो. मी कॉमन मॅन मुख्यमंत्री आहे. जनता आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

'शिंदेंना लॉटरी लागली, मुख्यमंत्री झाले, पण टिकवता आली... मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा वाद हा काही राज्याला नवा नाही. मंत्री गणेश नाईक

पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षेची कमान तृतीयपंथीयांच्या हाती

पुणे : पुणे महानगरपालिकेमध्ये सध्या सुरक्षेची जबाबदारी काही तृतीयपंथीयांवर देण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या

पोलीस अधिकाऱ्याची आंदोलकाला फिल्मी स्टाईल लाथ का मारली? पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं

गेल्या दोन दिवसापासून जालन्यातील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलीस उपाधिक्षक अनंत कुलकर्णी असं या अधिकाऱ्यांचे

कोकणात पुढील 4 दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यभरात सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून कोकणात पुढील ४ दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा

Pune Accident News : ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा कहर, मद्यधुंद चालकाने ठोकली चक्क डीसीपींची गाडी

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि त्यातून होणारे अपघात (Pune Accident News) या घटनांत

मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी, किंग्ज सर्कल, अंधेरी, दादर तुंबलं, पोलिसांचा अलर्ट

मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाळा सुरुवात झाली असून मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे. एकीकडे मुंबईसह