मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवर यंदाचा बिग बॉस मराठी सिझन ५ सुपर हिट ठरला होता.या शोमध्ये रितेश देशमुख याने होस्ट केले होते. रितेश देशमुखने पहिल्यांदाच केलेल्या या होस्टिंग बद्दल प्रेक्षकांकडून सुरूवातीला अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांनी भाऊच्या धक्क्याला भरभरून प्रेम दिले. बिग बॉस मराठी सिझन ५ यासह रितेशच्या पहिल्याच पर्वाला ग्रँड ओपनिंग टीआरपी मिळाला. शेवटपर्यंत हा टीआरपी नंबर वन ठरला. २८ जुलै ला सुरु झालेला बिग बॉस मराठी सिझन ५ चा प्रवास ६ ऑक्टोबर ला संपुष्टात आला. परंतु हा शो संपल्यावर कलर्स मराठी वाहीनीवर मोठा परिणाम दिसून येत आहे.
बिग बॉस मराठी सिजन ५ च्या ग्रँड फिनालेला ५ TVR एवढं रेटिंग मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोमुळे ‘कलर्स मराठी’ वाहिनी महाराष्ट्रातील वाहिन्यांच्या टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी पोहोचली होती. मात्र हा शो संपल्यामुळे कलर्स मराठी वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर आली आहे.
दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनी १ हजार ५७४ पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. ५२९.१८ पॉइंट्ससह दुसरं स्थान ‘झी मराठी’ वाहिनी, तिसर्या स्थानावर ४५७.९४ पॉइंट्ससह सोनी सब तर या आठवड्यात कलर्स मराठीला ३८५.७६ एवढं रेटिंग मिळालं आहे.