Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीMatheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदवार्ता! 'या' तारखेपासून पुन्हा रुळावर धावणार माथेरानची...

Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदवार्ता! ‘या’ तारखेपासून पुन्हा रुळावर धावणार माथेरानची मिनीट्रेन

मुंबई : मुंबईकरांसाठी सर्वात जवळचे हिल स्टेशन (Hill Station) म्हणजे माथेरान (Matheran). या माथेरानचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांसाठी ‘माथेरानची राणी’ म्हणजेच मिनीट्रेन (Matheran Mini Train) उपलब्ध करु देण्यात आली आहे. नेरळ ते माथेरान अशा २१ किलोमीटरच्या प्रवासात डोंगर दऱ्या पाहत प्रवास करताना पर्यटकांना मोठा आनंद मिळतो. पावसाळ्याच्या कालावधीत घाटरस्ता आणि अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे चार महिने ही मिनीट्रेन सेवा बंद ठेवण्यात येते. परंतु परतीच्या पावसानंतर दरवर्षी १५ ऑक्टोबरपासून मिनीट्रेनची सेवा प्रवाशांसाठी पुन्हा सुरु केली जाते. मात्र यंदा ही तारीख उलटून गेली तरीही मिनीट्रेन सुरु न केल्यामुळे पर्यटक नाराजीचा सूर मारत असताना आता लवकरच ही माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १ नोव्हेंबरपासून माथेरानची राणी पुन्हा धावण्यास सज्ज होणार आहे. काही तांत्रिक गोष्टींमुळे यंदा ही सेवा सुरू होण्यास विलंब झाला असून सध्या परतीचा पाऊसही ओसरला आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच ही सेवा सुरु होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दरम्यान, पर्यटकांचा प्रतिसाद पाहता या मार्गावर फेऱ्या वाढवल्यास पर्यटनात आणखी वाढ होऊ शकते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -