State Excise Department : रायगडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अ‍ॅक्शन मोड!

  97

दोन लाख ७१ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त


अलिबाग : राज्यभरात विधानसभा निवडणूक २०२४चे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले असताना आचारसंहिता देखील लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) आता अ‍ॅक्शन मोडवर आला आहे. रायगड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ते १६ ऑक्टोबर या कालाववधीत एकूण १८ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये ५०६०.१२ लिटर दारु जप्त करण्यात आली असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत रुपये २ लाख ७१ हजार ४२५ आहे.


अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत इसमांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यामधील कलम ९३ अंतर्गत एकूण ६० प्रस्ताव विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले असून १३ कलम ९३ अंतर्गत बंधपत्र करुन घेण्यात आले आहेत. तसेच संशयित आरोपी ज्ञात पत्त्यावर भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६८ (फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम १४९) नुसार संबंधितांना गुन्हयापासून परावृत्त करण्याकरीता एकूण ३६२ कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत.


रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणूक २०२४ आचारसंहिता कालावधीत सर्व मद्य उत्पादक घटक, ठोक विक्री व किरकोळ विक्री अनुज्ञप्तीवर प्रभावी नियत्रंण ठेवण्याकरीता अनुज्ञप्त्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सदरचे कंट्रोल रुम या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आले आहे. दरम्यान, आचारसंहिता कालावधीत या विभागाची सात पथके तैनात करण्यात आले असून पथकांस आंतरराजीय मद्य तस्करी होणार नाही, तसेच बेकायदेशीर हातभट्टी दारुनिर्मिती, विक्री केंद्र व वाहतूक यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे.



विभागाकडून नागरिकांना आवाहन


सर्व नागरिकांनी विधानसभा निवडणूक २०२४ मुक्त व निर्भयपणे पार पाडावी याकरीता विधानसभा मतदारसंघात मतदारांना दारुचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनास आल्यास, तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास या विभागाचा व्हॉटस अ‍ॅप क्र. ८४२२००११३३ व टोल फ्री क्र.१८००२३३९९९९व अधीक्षक कार्यालय रायगड येथील दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२२८००१ वर संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील