Wednesday, April 30, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

CID : CID मालिका आता हिंदी नव्हे तर मराठी वाहिनीवर येणार

CID : CID मालिका आता हिंदी नव्हे तर मराठी वाहिनीवर येणार

मुंबई : सोनी हिंदी या वाहिनीवर एकेकाळी सीआयडी या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली सीआयडी ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. इंस्पेक्टर दया, इंस्पेक्टर अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न आपल्या अनोख्या शैलीतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहेत. अनेक गुन्हेगारी घटनांची संकल्पना मांडणा-या CID या मालिकेने २१ जानेवारी १९९८ रोजी पहिला भाग प्रसारित केला तर २०१८ मध्ये १ हजार ५४७ भाग पूर्ण करत प्रेक्षकांचा निरोप घेतला .

त्यानंतर 'दया तोड दो दरवाजा' म्हणत तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी CID मालिका आता हिंदी वाहिनीवर नव्हे तर मराठी वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होणार असून प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

कधी होणार प्रक्षेपित ?

सोनी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित होणा-या CID मराठी या मालिकेची प्रक्षेपण तारीख अद्यापही समोर आलेली नाही. परंतु लवकरच तारीख जाहीर केली जाईल असे सोनी मराठी वाहिनीने सोशल मीडिया च्या माध्यमातून सांगितले आहे.

Comments
Add Comment