सलमान खानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. बिश्नोई गँगकडूनच अभिनेता सलमान खानला मागच्या अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने सलमान खानच्या सुरक्षेत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.त्याच्या घरापासून फार्म हाऊसपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


सलमान खानला यापूर्वी वाय प्लस श्रेणी सुरक्षा देण्यात आली होती, जी आता अपग्रेड करण्यात आली आहे. सलमान खानच्या सुरक्षेत आता पोलिसांच्या एस्कॉर्ट कारचा समावेश करण्यात आला आहे. जेव्हा सलमान घराबाहेर पडेल त्यावेळी ही कार त्याच्यासोबत असेल.


सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.त्याच्या घराबाहेर पोलीस कडेकोट बंदोबस्तामध्ये आहेत. माध्यमांनाही त्याच्या घराजवळ परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या पनवेल फार्म हाऊसची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.फार्म हाऊसच्या आत आणि बाहेर पोलीस तैनात करण्यात आली आहे. याशिवाय या फार्म हाऊसकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा

नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वध!

मुंबई : आज सर्वत्र दिवाळीच्या उत्साहात नरकचतुर्दशी साजरी होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी

दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धीसह सौहार्द घेऊन येवो - उपमुख्यमंत्री पवार

मुंबई : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि