Sunday, January 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRaju Shetty : राजू शेट्टींची मोठी उडी; स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणूक...

Raju Shetty : राजू शेट्टींची मोठी उडी; स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार!

बेळगाव : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) कोणत्याही राजकीय पक्षाशी हातमिळवणी करणार नाही, तर स्वतंत्रपणे सर्व जागांवर निवडणूक लढविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले. याबाबत नियोजन सुरू असून लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले.

महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्यांचे धोरण एकच आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘परिवर्तन महाशक्ती’च्या नावाखाली राज्यातील छोटे पक्ष एकत्रित करून संघटना बळकट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची झालेली हत्या अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सुरक्षारक्षकांच्या गराड्यात असणाऱ्या नेत्याची हत्या केली जात असेल तर सर्वसामान्यांचे रक्षण हे सरकार काय करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -