Sunday, January 19, 2025
Homeताज्या घडामोडीMakarand Anaspure : मकरंद अनासपुरेंचा दिवाळीनंतरचा नवरंगी धमाका! ‘मूषक आख्यान’चे पोस्टर लाँच

Makarand Anaspure : मकरंद अनासपुरेंचा दिवाळीनंतरचा नवरंगी धमाका! ‘मूषक आख्यान’चे पोस्टर लाँच

मुंबई : मराठी सिनेसॄष्टीतील आघाडीचा विनोदी अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे यांची ओळख आहे. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी त्यांनी खूप धडपड केल्याचे सर्वांनाच माहित आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असतात.‘राजकारण गेलं मिशीत’ या धमाल चित्रपटानंतर आता लवकरच नव्या चित्रपटात ते नऊ रंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहेत.

अभिनेता मकरंद अनासपुरे यांचे ‘मूषक आख्यान’ (Mushak Akhyan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशमाने डिजी व्हिजन’द्वारे प्रस्तुत ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने यांनी केली आहे. हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे पोस्टर लाँच आणि टीझर रिलीजचा सोहळा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर श्री सिद्धिविनायक मंदिरात संपन्न झाला.

गौतमी पाटीलची ठसकेबाज लावणीही दिसणार

या चित्रपटाचे छाया दिग्दर्शन, सुप्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक सुरेश देशमाने यांचे आहे. हर्षदा पोरे कल्लुरकर यांनी लिहिलेल्या गीतांना अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गाणी खूपच श्रवणीय झाली आहेत. सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण असणार आहे.

संकलन अनंत कामत तर पार्श्वसंगीत अभिजित हेगडे यांचे आहे. व्हीएफएक्स अरविंद हतनुरकर तर साउंड डिझाईनची जबाबदारी मयूर वैद्य यांनी सांभाळली आहे सह-छायांकन जगदीश देशमाने यांचे आहे. पोस्ट प्रॉडक्शन रश मिडिया, अन्वय उत्तम नायकोडी, रंगभूषा- कुंदन दिवेकर, वेशभूषा- माधुरी मोरे यांचे आहे. या चित्रपटात अर्कचित्रांचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे आणि ही अर्कचित्रे नागपूरचे व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी केली आहेत.

दरम्यान, ‘मूषक आख्यान’ चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासह भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव यांच्या लक्षणीय भूमिका आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -