Friday, June 20, 2025

कर्मचाऱ्यांची 'दिवाळी' दणक्यात ... दिवाळीसाठी मुंबई महापालिकेकडून २९ हजार रुपयांचा बोनस जाहीर

कर्मचाऱ्यांची 'दिवाळी' दणक्यात ...  दिवाळीसाठी मुंबई महापालिकेकडून २९ हजार रुपयांचा बोनस जाहीर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दिपोत्सव २०२४ निमित्त २९ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस (Diwali) जाहीर करण्यात आला आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आज घोषणा केल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांना दिवाळी २०२४ प्रित्यर्थ सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात महानगरपालिकेतील (BMC) विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील याबद्धलचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर, राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच मुंबई महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट बोनस जाहीर करण्यात आला आहे.

दिवाळी २०२४ करिता मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्या चर्चेनंतर महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. त्याचा तपशील, क्रम, आणि सानुग्रह अनुदान रक्कम खाली देण्यात आली आहे. दीपावली – २०२४ करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱयांना पुढीलप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. त्याचा क्रम, तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम या क्रमाने माहिती पुढीलप्रमाणेः


१. महानगरपालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये २९,०००

२. अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः रुपये २९,०००

३. महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः रुपये २९,०००

४. माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००

५. माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००

६. अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००

७. अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित): रुपये २९,०००

८. सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV): भाऊबीज भेट रुपये १२,०००

९. बालवाडी शिक्षिका / मदतनीस - भाऊबीज भेट रुपये ५,०००

Comments
Add Comment