Pndharpur News : भाविकांना मिळणार सुलभ दर्शन! विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि दर्शन रांग करण्यासाठी १२९.४९ कोटीच्या प्रकल्पास मान्यता

सोलापूर : महाराष्ट्रात पर्यटन विकसित करुन त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण करण्यास मोठा वाव असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेता त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल- रुख्मिणी मंदिर, पंढरपूर येथे यात्रा कालावधी दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात उभा करण्यात येणारा दर्शनमंडप आणि दर्शनरांगेसाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांनी १६ जुलै रोजी पत्रान्वये शासनास प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्तावास मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.


मिळालेल्या मान्यतेनुसार, श्री विठ्ठल- रुख्मिणी मंदिर, पंढरपूर येथे कायमस्वरुपी दर्शनमंडप आणि दर्शनरांग करणेकरीता शासन निर्णय नुसार १२९.४९ कोटी रकमेच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता तर १३ कोटी इतका निधी वितरीत करण्यासही यात मान्यता देण्यात आलेली आहे.



कसं असेल प्रकल्पाचे विवरण?


दर्शन मंडप - मुलभूत सुविधा व इलेक्ट्रिकल वर्क सहित ८७ कोटी ३१ लाख तर दर्शन रांग (स्कायवॉक) सर्व सुविधायुक्त व इलेक्ट्रिकल वर्क सहित ४२ कोटी १८ लाख इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून या कामाकरीता १३  कोटीचा निधी सन २०२४-२५ या वर्षात वितरित करण्यास मान्यता मिळालेली आहे.



जिल्हाधिकारी यांचा सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश


जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दर्शन मंडप व स्काय वॉकचा बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच पंढरपूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था व्हावी यासाठी अत्यंत नियोजनबद्धरित्या हा आराखडा तयार केला. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी हा आराखडा प्रथम पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीत मंजूर करून घेतला. त्यानंतर १७  ऑगस्ट २०२४ रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीत हा आराखडा प्राथमिक दृष्ट्या मंजूर झाला. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी या समितीने या आराखड्यास मंजुरी दिली व २४ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आराखड्याला अंतिम मंजुरी दिलेली आहे.


दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला दर्शन मंडप व दर्शन रांगेचा प्रश्न आता लवकरच सुटणार असून यामुळे महाराष्ट्र राज्य सह देशभरातील विठ्ठल भक्तांना श्री विठ्ठलाचे दर्शन सहज व सुलभ होणार आहे.

Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.