बिग बॉस मराठी ५चा विजेता सुरज चव्हाण सध्या चर्चेत आहे. बिगबॉसच्या विजयानंतर बारामतीच्या सूरज चव्हाणची (Suraj Chavan) भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वत: सूरजला फोन केला होता. पण त्यावेळी सूरजला अजित पवार यांना भेटणं शक्य झालं नाही. पण अखेरीस सूरज चव्हाण बिग बॉसची ट्रॉफी घेऊन अजित पवारांच्या भेटीला गेलाय. त्याचप्रमाणे अजित पवारांनी यावेळी सूरज चव्हाण घराचीही भेट दिली आहे. गावात नवीन जागा घेऊन त्याला घर बांधून द्या अशी सूचना अजित पवारांनी फोनवरुन दिल्या आहेत. अजित पवारांनी यावेळी सूरजच्या घराच्यांचीही चौकशी केली. तसेच सूरजने अजितदादांना त्याच्या वडिलांच्या जाण्याचा प्रसंग सांगितला. सूरजच्या बहिणींविषयीही अजित पवारांनी चौकशी केली होती. तसेच सूरजचा बिग बॉसमध्ये प्रवेश कसा झाला याविषयीही अजित दादांनी चर्चा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरजचं घर लहान आहे… त्याला गावात घर बांधून द्या अशा सूचना यावेळी दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरात सूरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकच नव्हे तर बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचं सांगितलं होतं. पण आता थेटन उपमुख्यमंत्र्यांनीच सूरजला घर गिफ्ट केलं आहे.
बिग बॉसमध्ये सुरज चव्हाणची एंट्री रिलमुले झाली आणि सुरजला त्याच्या रिलमुळेच प्रसिद्धी मिळाली. त्यावर अजित पवारांनी त्याला विचारलं की, बिग बॉस मध्ये कसं बोलवलं? तेव्हा सुरज म्हणाला की, मला रिल बघून बिग बॉसमध्ये बोलावलं. बिग बॉसचा मला कॉल आला तेव्हा खरं वाटत नव्हता. पण मग खरं वाटलं आणि गेलो. त्यानंतर पुढे , रिलचे पैसे मिळतात का? त्यावर सूरजने म्हटलं की, नाही रिलचे पैसे मिळत नाहीत, आता पिक्चर येतोय माझा…
अजित पवारांना सूरजने बिग बॉसच्या घरातील काही किस्सेसुद्धा सांगितले. त्यावेळी सुरजच्या बोलण्यावरुन अजित पवारांना देखील हसू आवरत नव्हतं. सूरजने अजित पवारांना सांगितलं की, दादा ट्रॉफी बारामतीमध्ये आणायची हे मी आधीच ठरवलं होतं. मला बिग बॉसनेही खूप सपोर्ट केला. मी जे बोलतो ते करुन दाखवतोच.
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…