जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय मैदानात नवा डाव आखल्याची चर्चा आहे. आपल्या नातवाच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या आंदेकरने पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायालयाकडून विशेष परवानगी घेतली होती. या परवानगीनंतर शनिवारी तो पोलिस बंदोबस्तात क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाला आणि समर्थकांसमोर जोरदार घोषणाबाजी करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला.


विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर आंदेकर कुटुंबातील बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे तिघे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले होते. मात्र अर्ज अर्धवट भरलेले असल्याचे निदर्शनास आल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी हे अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे हे तिघे पुन्हा अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


दरम्यान, बंडू आंदेकरसह तिघांचे अर्ज बाद झाल्यानंतर आता जेलमधून बाहेर येण्यासाठी हा संपूर्ण प्रकार मास्टरप्लॅनचा भाग असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर वनराजच्या पत्नीनेही आंदेकरांच्या पावलावर पाऊल टाकत निवडणूक प्रक्रियेचा मार्ग अवलंबल्याचे बोलले जात आहे. आंदेकर कुटुंबातील बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर हे प्रभाग क्रमांक २२, २३ आणि २४ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे.


‘नेकी का काम, आंदेकर का नाम’ आणि ‘आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत’ अशा घोषणा देत आंदेकरने आपली राजकीय उपस्थिती दाखवून दिली. विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिल्यानुसार काल दुपारी पोलिस बंदोबस्तात हे अर्ज दाखल करण्यात आले होते. बंडू आंदेकरने प्रभाग क्रमांक २४ कसबा पेठ-कमला नेहरू रुग्णालय-केएमई येथून तर लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांनी प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ-नाना पेठ येथून अर्ज भरल्याची चर्चा होती. मात्र अर्ज अपूर्ण असल्याने ते स्वीकारण्यात आले नसल्याचे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Prakash Abitkar : गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर उभे करण्याचे नियोजन रुबी हॉल क्लिनिक

106 Maharashtra Martyrs To Be Honored : संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता